Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेला काँग्रेसची फिकीर आहे की नाही? ही कशी आघाडी? – संजय निरुपम

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यांपासून कॉंग्रेसचे नाराजीनाट्य बघायला मिळत आहे, सुरुवातीला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे नाराज असल्याचं पुढे आलं. नंतर दोघांनीही मातोश्रीवर जाऊन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि सर्व आलबेल असल्याचं सांगितलं. कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही आता टीका केली आहे.

राज्याचे मुख्यसचिव अजोय मेहता यांच्या प्रकरणावरून पुन्हा सेना आणि काँग्रेस पक्षात वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने काँग्रेसला खिजवले, अशा शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्वपक्षाचे कान टोचले आहेत. अशी टीका काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.

राज्यात ज्या मुख्य सचिवांमुळे काँग्रेसचे सर्व मंत्री त्रस्त असल्याचे बोलले जाते त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागाराची भूमिका देण्याचा निर्णय काँग्रेसला खिजवणारा आहे. शिवसेनेला काँग्रेसची फिकीर आहे की नाही? ही कशी आघाडी?” असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.