आज पत्रकार परिषदेत बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात सामील झालेले नाशिक येथील खासदार हेमंत गोडसे यांना टोला लगावलत आव्हान दिलं होतं. त्यालाच आता हेमंत गोडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे, संजय राऊत यांनी चेहऱ्यावरून केलेली टीका गोडसे यांना चांगलीच जिव्हारी लागल्याचे यातून दिसून आले आहे. याच टीकेमुळे राऊत आणि गोडसे यांच्यात वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात राऊत करतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचे देखील गोडसे म्हणाले.
संजय राऊत म्हणतात त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा होता, चेहरा नाही तर काम महत्वाचं असत, असं प्रत्युत्तर हेमंत गोडसे यांनी दिलं आहे. तसेच, संजय राऊत यांनी राऊत यांनी कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली, या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळं केलं असल्याचा आरोप देखील गोडसेंनी केला आहे.हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का ? शिवसेना हे नाव चेहरा आहे, शिवसेना नावाची चार अक्षरं चेहरा आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवाय जे सोडून गेले आहे त्यांनी त्यांची राजकीय कबर खोदली आहे. असं म्हणत असतांना संजय राऊत यांनी ते प्यारे झाले आहे , अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली होती.