Latest Marathi News

BREAKING NEWS

“चंद्रकांतदादांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन..!”

0

कोल्हापूर |

साडेतीन शक्तीपीठ मध्ये समाविष्ट असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले, यावेळी दर्शनास आलेल्या अनेक भाविकांची चंद्रकांत दादांनी संवाद साधत भेटही घेतली. गोरगरीब जनता कष्टकरी व शेतकऱ्यावर येणारे संकटे दूर होऊन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी शक्ती व आशीर्वाद द्यावा असे साकडे करवीर निवासिनी आई महालक्ष्मीकडे चंद्रकांत दादा यांनी घातले.

मंदिर परिसरात नागरिकांशी संवाद साधत असताना स्केटिंगपटू बालमित्राची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत घवघवीत यश मिळावं, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.