राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकांचे संकेत दिले असून नेत्यांनी तयार राहवे, अशा सूचनाही दिल्याचे समजते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
तसेच या बैठकती विविध विषयांवर चर्चा झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याचे संकेत पवारांनी दिले. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे.
“पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग?” असा खोचक सवाल भाजपाने शरद पवारांना विचारला आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??” असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.