Latest Marathi News

BREAKING NEWS

“या चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धवसाहेबांना बावरट केलं”

0

 

भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. “आमच्यावर बरीच टीका करण्यात आली. बंडखोरी केल्याचं म्हटलं. आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केलाय. आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी फारक घेऊ नये म्हणून या विचारावर पुन्हा आलो आहोत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. “माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं. अनेकांना त्यांनी पुढे आणलं. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दीघेंच्या आशीर्वादानं आम्ही आज आमदार झालो,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

५५ आमदारांमधून ४० आमदार कसे फुटतात? आपला साधा मेंबर जरी फुटला त्याची विचारपूस आम्ही करतो. ४० आमदार फुटतात ही आजची गोष्ट नाही. बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दुख देण्याची इच्छा नाहीये, असंही त्यांनी नमूद केलं. अनेकदा आमदार व्यथा मांडायला जायचे, पण चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हाती घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. या दोन वर्षांत कोरोना आला.

Leave A Reply

Your email address will not be published.