महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांकडून ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा नेत्यांनी हजेरी लावली होती.
या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी टीका केली. भाजप नेते प्रसिद्धीकरीता आंदोलनात सहभागी झाले आहेत फक्त टेव्हीवर झळकण्याची ते सामील झाल्याची टीका त्यांनी केली होती . त्यावर सदाभाऊ खोत यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, असे ते म्हणाले.
“रोहित पवार हे महान नेते आहेत. महान नेत्यांच्या बाबतीत शेतकर्यांच्या मुलांने काय बोलावे. त्यांच्या सरकाराच्या काळात एवढे चांगले निर्णय घेतले की, विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो असून हे सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेईल. तसेच रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी हे उद्याचे अधिकारी आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी वर्गामागे हे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या बाजूनेच निर्णय घेतील.” असे सदाभाऊ खोत म्हणाले.