मुंबई : सुशांतसिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्ज अँगलने नवीन वळण दिले आहे. २०१७ पासून रिया चक्रवर्ती ड्रग घेत असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर रियाला तुरुंगाची हवा खावी लागली होती. यानंतर नार्को टेस्ट कंट्रोल ब्युरो (एन सी बी) द्वारे रियाची चौकशी झाल्यानंतर तिने बॉलीवूड मधील २५ बड्या लोकांची नावे घेतली आहेत.
एन सी बी ने रियाच्या स्टेटमेंटनंतर धडक कारवाई करत छापेमारीला सुरुवात केली आहे. ही नावे एन सी बी ने जरी उघड केलेली नसली तरी यात अनेक बडे प्रोड्युसर, डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर, व्हिडीओ जॉकी, कलाकार यांचा समावेश आहे. रियाच्या या स्टेटमेंटनंतर बॉलीवूडमधील अनेक बड्या लोकांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.
मध्यंतरी रियाच्या घरी जो छापा मारण्यात आला, तिथे सापडलेल्या इलेक्ट्रोनिक डिव्हाईस मधून बरीच माहिती समोर आली होती. यामुळे अनेक ड्रग सप्लायर्सचे नेटवर्क समोर आले होते. रियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. दरम्यान या तपासात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेपर्यंत तपास थांबवणार नसल्याचे एन सी बी कडून सांगण्यात येत आहे.