Latest Marathi News

BREAKING NEWS

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्षपदाचा पदभार अनिल डिग्गीकर यांनी घेतला.

0

मुंबई : म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्षपदाचा पदभार अनिल डिग्गीकर यांनी घेतला. त्यांचा सरकार करताना अरुण डोंगरे यांनी केला.

राज्य सरकारने दुपारी सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून दाखविण्यात आली होती. परंतु चारच तासांत डिग्गीकर यांच्या नियुक्तीच्या आदेशात बदल करण्यात आला. सरकारने नव्याने काढलेल्या आदेशात त्यांची नियुक्ती म्हाडाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली.

राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

एम. जे. प्रदीप चंद्र- व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर

विवेक जॉन्सन- अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा उपविभाग या पदावर नियुक्ती

अमित सैनी – महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई या रिक्त पदावर

श्री दीपक कुमार मीना – जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर

एस राममूर्ती – जिल्हाधिकारी बुलढाणा

प्रशांत नारनवरे- आयुक्त समाजकल्याण कल्याण, पुणे, या पदावर (श्री प्रवीण दराडे यांच्या जागी)

Leave A Reply

Your email address will not be published.