मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे येत आहे, अशा बर्या च गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स पाहिल्यानंतर एक चिंताजनक बाब समोर आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती बांद्र्याच्या डीसीपींसोबत सातत्याने संपर्कात होती. तिने त्यांना बऱ्याचवेळा फोन देखील केलेला आहे.
कॉल डीटेल्स पाहून कळले की रिया चक्रवर्ती आणि डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची फोनवर चार वेळा चर्चा झाली. शिवाय मँसेजद्वारे संपर्कही करण्यात आला. उघडकीस आलेल्या माहितीनुसार रियाने २१ जून रोजी त्रिमुखे यांच्याशी २८ सेकंद फोनवर चर्चा केली. २२ जून रोजी त्रिमुखे यांनी रियाला मँसेज पाठविला. यानंतर अभिषेक त्रिमुखे २२ तारखेला रीयासोबत २९ सेकंद बोलले. ८ दिवसांनंतर रिया चक्रवर्तीला त्रिमुखे यांचा फोन आला. दोघांमध्ये ६६ सेकंद संभाषण झाले. यानंतर दोघे काही दिवस एकमेकांशी बोलले नाहीत. पुन्हा एकदा 18 जुलै रोजी त्रिमुखे यांना रियाने फोन केला.
मुंबई पोलिसांच्या मते रियाला वांद्रे पोलिस स्टेशन आणि सांताक्रूझ स्टेशनला स्टेटमेंट देण्यासाठी बोलावण्यात आलेले होते. हा फोन कॉल अधिकृत कारणास्तव केला होता. परंतु या कॉल रेकोर्डिंग मध्ये नेमकं काय बोलण झालं यावरून अनेक तर्क बांधले जात आहेत.