भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या खंड क्र २३ आणि जनता THE PEOPLE व इतर खंडांच्या पुनर्मुद्रित खंडांचे आज मंत्रालयात प्रकाशन
मुंबई , ०३ ऑक्टोबर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या खंड क्र २३ आणि जनता THE PEOPLE व इतर खंडांच्या पुनर्मुद्रित खंडांचे प्रकाशन आज मंत्रालयात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर हा प्रकाशन सोहळा पार पडला. मंत्रिमंडळातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव श्री.आगलावे, समितीचे सदस्य डॉ.संभाजी बिरांजे, डॉ.सुरेंद्र धाकतोडे, डॉ. योगिराज बागुल,डॉ. बबन जोगदंड, ज.वि.पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.