Latest Marathi News

BREAKING NEWS

माझ्या दृष्टीने दर्जेदार आरोग्यसेवा पुरवून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे यापेक्षा मोठी सेवा असूच शकत नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे : आरोग्यसेवा हीच खरी सेवा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच म्हणत असतात. त्यांनी आपली पालकमंत्री म्हणून जबाबदारी नियमितपणे पार पडली आहे. कोथरुडमधील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी प्रयत्नशील राहणे हे चंद्रकांत पाटील आपले कर्तव्य समजतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना अधिकाधिक चांगले उपचार मिळावेत, यासाठी मागील वाढदिवस आरोग्य सेवेसाठी त्यांनी समर्पित केला होता. यामधून संकलित निधीच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करण्याची संधी मिळत आहे, याचा प्रचंड आनंद होत आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भोसरी मतदार संघातून श्रीकांत कदम या व्यक्तीने एक चिमुकल्या बाळासाठी मदत मागितली होती. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यलयातून त्यांना खूप सहकार्य मिळले. त्यांना निधी मिळवून देण्यास मदत करण्यात आली. यासोबतच पाटील यांच्याकडूनही त्यांना निधी देण्यात आला. या निधीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. यासाठी श्रीकांत कदम यांनी चंद्रकांत पाटील याचे मनापासून आभार मानले.

यासोबतच कोथरूड मधील एका कॅन्सरग्रस्त महिलेला त्यांच्या इंजेक्शनच्या खर्चासाठी देखील चंद्रकांत पाटील यांच्याकडून बहुमूल्य मदत करण्यात आली. त्यांनी देखील पत्र पाठवत पाटील यांचे आभार मानले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, माझ्या दृष्टीने दर्जेदार आरोग्यसेवा पुरवून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे यापेक्षा मोठी सेवा असूच शकत नाही. त्यामुळे भविष्यातही ही सेवा माझ्या हातून घडो यासाठी कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.