Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुस्तक भेट देऊन केले अभिनंदन

0

मुंबई : डॉ. प्रकाश महानवर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “Modi shaping a global order in flux” हे पुस्तक त्यांना भेट देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू श्री.महानवर यांच्याशी विद्यापीठ आणि प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक कारकीर्द याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. महानवर मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.