“आमचं ठरलंय”.. मग कोल्हापूरकर, कोरोनाबद्दल नक्की काय ठरलंय?
कोल्हापूर : “आमचं ठरलंय’.. या खास कोल्हापुरी घोषवाक्याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचेही राजकारण ढवळून काढले होते. आता पुन्हा त्याच “घोषवाक्याची हवा” कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या गतीने वाहू लागली आहे. पण नक्की काय ठरलंय?
कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कोल्हापुरात इतर राज्याच्या तुलनेत ठरले आहे. कोल्हापूरचा हा रिकव्हरी रेट तब्बल 90.4 टक्के आहे.कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी जाहीर केले आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा (रिकव्हरी रेट) 49.8 टक्के तर, देशाचा 52.7 टक्के आहे, मात्र कोल्हापूरमधील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.4 टक्के आहे. रुग्णाचे कोरोना तपासणी अहवाल घेतल्यानंतर पुन्हा 17 दिवसांत तो बरा होतो. इतर जिल्ह्यात शासनाने दिलेल्या वेळेत बरा न होता. 17 दिवसांपेक्षा जास्त दिवसांनी बरे होत आहेत; पण कोल्हापुरातील बाधित रुग्ण 17 दिवसांत बरे होत आहेत.
आरोग्य सेवा संचालनालयाकडून याचा दैनंदिन आढावा घेतला जातो. यामध्ये राज्यात कोल्हापूरमध्ये असणारे कोरोना रुग्ण लवकर बरे होताना दिसून आले आहेत. वाशीममधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 23.9 टक्के आहे. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकांचे स्वॅब घेतले जात होते. त्यातून जो कोरोना बाधित निघेल त्याला योग्य उपचार, त्याला राहण्याची सोय तसेच हा रुग्ण बरा होण्यास पोषक असणारे कोल्हापूरचे प्रदूषण विरहित वातावरण कारणीभूत ठरत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
..