Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्र्वादीत तीन भावी मुख्यमंत्री उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना रोहित पवारांच्या नावाने वर्तुळ पूर्ण होईल”

0

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता समोर येताना दिसत आहे. सुरुवातीला जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकले. आधी जयंत पाटील, मग अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून पक्ष कार्यालयाबाहेर झळकले. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, मनसेने या प्रकारावर खोचक टीका केली आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बॅनरबाजीवरून टीका केली आहे. राष्ट्रवादीचे तीन भावी मुख्यमंत्री उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल. तीन भावी मुख्यमंत्री एकाच पक्षात असल्याने आता कार्यकर्ते सतरंज्या उचलणार का? असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर राष्ट्रवादीचे नेते स्वत:चा पक्ष संपवण्याच्या नादी लागले आहेत. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ते भावी मुख्यमंत्री असतील, असे बॅनर लागले होते. तो वाढदिवस संपत नाही, तोपर्यंत अजित पवार यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील कोल्डवॉर काही नवीन नाही. आता सुप्रिया सुळे यांच्या नावानेही भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.