Latest Marathi News

BREAKING NEWS

अक्षय कुमार सोडणार कॅनडाचं नागरिकत्व, काय आहे कारण वाचा !

0

अभिनेता अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये खिलाद्दि म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. त्याचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. अक्षय नेहमीच हटके अंदाजात चाहत्यांशी संवाद साधत असतो. अक्षय आपल्या मजेशीर आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र अनेकदा अक्षयला अनेकदा एका गोष्टीमुळे ट्रोल होत असतो. आणि ती गोष्ट म्हणजे अभिनेत्याकडे असलेलं कॅनडाचं नागरिकत्व. अनेकांना अक्षयची ही गोष्ट रुचत नाही.

भारतात राहून, हिंदी सिनेमातू प्रसिद्धी मिळवून अक्षयचं कॅनेडियन नागरिकत्व जपणं अनेकांना खटकतं. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. अक्षय कुमार सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अभिनेता वर्षातून किमान दोन ते तीन सिनेमे करतच असतो.अक्षयचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावतो. सध्या तो आपल्या ‘एल्फि’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो नुसरत भरुचा आणि इम्रान हाशमीसोबत दिसणार आहे. कलाकार या सिनेमाचं दणकून प्रमोशन करत आहेत.

अक्षय आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके फंडे अवलंबत आहे. त्यामुळे हा सिनेमा आणि कलाकार सोशल मीडियावर सध्या चर्चेत आले आहेत. दरम्यान एका मुलाखतीत अक्षय कुमारने आपल्या कॅनेडियन नागरिकत्वावर मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने आपल्यासाठी भारतच सगळं काही असून आपण कॅनेडियन नागरिकत्व सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यासाठी आता अभिनेत्याने आवश्यकती प्रक्रियाही सुरु केली आहे. आज तकच्या वृत्तानुसार, याबाबत बोलताना अक्षय कुमारने म्हटलं, ‘लोक या विषयावर नेहमीच मला सुनावत असतात. मला नेहमीच या गोष्टीमुळे टोमणे ऐकावे लागतात. त्यामुळे आपल्याला वाईट वाटत असल्याचंही अभिनेता म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.