शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात आहे. महाविकास आघाडीच्या तीन चाकांपैकी एक चाक आता डगमगलं आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंड पुकारलं असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये असल्याचा दावा शिंदे यांच्याकडून केला जात आहे.
अनेक बंडखोर आमदारांनी आपल्या नाराजीची कारणंही सांगितली आहेत. अशात आता दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका’, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं आपल्या ट्विटमध्ये योगेश कदम यांनी लिहिलं, ‘सप्रेम जय महाराष्ट्र. मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..!
भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरजही पडणार नाही.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेलं हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल.
या ट्विटमधून योगेश कदम यांनी ते शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी शिवसेनेतच राहाणार आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेना संपत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.