Latest Marathi News

BREAKING NEWS

‘उगाच कळ काढु नका तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल’

0

 

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना चारही बाजूंनी संकटांनी घेरले असून एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेला चांगलंच महागात पडल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार केव्हाही कोसळेल अशी सध्या स्थिती असताना बंड केलेले आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करीत आहेत.

अशात मनसेनेही शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी ट्विट करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वतःच्याच पक्षातला केमिकल लोचा यांना कळला नाही असं शालिनीताई यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना हिणवले होते.

 

या टीकेवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिले आहे.’शालीनी बाई झटक्याचे नाव म्हणजे ब्रिजभूषण हे विसरू नका मताधिक्याची गोष्ट करू नका, उरलेला शिलेदार शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहे. आणि सरकार शिवसेनेचे असणार आहे,उगाच कळ काढु नका तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल तुमचा. तुमची मत किती तुम्ही बोलता किती!’ असं म्हणत प्रतिउत्तर दिल आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.