मुंबई: खासदार गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यातकाही दिवसांपासून वादाचे फटाके फुटत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी याची दखल घेत दोघांना ही मंगळवारी वर्षावर बैठकीसाठी बोलवले होते.या भेटीनंतर दोघांमधील वाद शंभर टक्के मिटल्याचे रामदास कदम यांनी म्हंटले आहे. . त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते तेव्हा ते म्हणाले, ‘मराठा समाज एकनाथ शिंदेंच्या अंगावर धावून आला तेव्हा अजितदादांना नेमका डेंग्यू झाला. हे मला काही समजत नाही, असे म्हणत अजित पवार यांच्या आजारपणावर निशाणा साधला आहे.
अजित पवार गटाचे सरकारविरोधात आंदोलन
पुढे कदम म्हणाले, जेव्हा संपूर्ण मराठा समाज एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला तेव्हाच अजितदादांना नेमका डेंग्यू झाला. हे मला काही समजत नाही. कधी कधी अजित दादांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार मुख्यमंत्री यांच्या विरोधात आंदोलन करतात. राज्यात मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असताना अजितदादा गटाचे सर्व आमदार सरकारविरोधातच आंदोलन करत होते, हे मला काही समजत नाही. ते दादा आहेत काहीही करु शकतात.अजित पवार आजारपणामुळे गेल्या काही दिवासांपासून माध्यमांपासून दूर आहेत.डॉक्टरांनी त्यांना डेग्यूची लागण झाल्यामुळे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यावरुन रामदास कदम यांनी टीका केली आहे.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले
कदम पुढे म्हणाले, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले हे समजू शकतो. पण, नंतरही वारंवार त्यांची भेट. दिवाळीला तर दिलीप वळसे पाटील अन् अजितदादा गटाचे आमदारही शरद पवारांची भेट घेतात. आजारी असलेले दादा दिल्लीत अमित शहांचीही भेट घेतात. हे नेमके चालू काय आहे, हे समजत नाही. असे ही ते म्हणाले.
अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर
रामदास कदम यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. रामदास कदम अजित पवारांवर बोलण्याएवढे मोठे नाहीत. अजितदादा त्यांच्या आकलनाबाहेरील आहेत. त्यांनी दादांच्या आजारपणावर बोलले यातून त्यांची संस्कृती दिसून येते. पवार कुटुंब राज्याची परंपरा जपत आहेत. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीबाबत बोलणं दुर्दैवी आहे. नाहीतर त्यांच्यावर डोळ्यांना झंडुबाम लावण्याची वेळ येईल, असे प्रत्युत्तर अजितदादा गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी दिले.