ऊस तोडीसाठी गडबड नको – प्रा.दीपक पाटील
शेतकऱ्यांनी ऊस दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नयेत,कारण यंदा उसाची प्रचंड टंचाई आहे.साखर कारखान्यांमध्ये ऊस नेण्यासाठी स्पर्धा लागणार आहे.त्यामुळे या परिस्थितीचा फायदा उठवून चांगला ऊस दर मिळू शकतो, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नयेत,तर वाढीव ऊस दराची लढाई जिंकता येणार आहे. वाहनधारकांनीही ऊस वाहतूक करू नये,वाहनधारकांच्या अडचणीच्या काळात संघटनाच त्यांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि वाहनधारकांनी जरा सबुरीने घ्यावे,असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दीपक पाटील यांनी केले आहे.
पाटणे फाटा / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यात उसदराची मागील शिल्लक व एकरकमी एफआरपी वरून एकमत न झाल्याने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवार दि.१८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पाटणेफाटा येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते तयारीमध्ये व्यस्त असून, चंदगड,आजरा,गडहिंग्लज तालुक्यातून शेतकरी बंधू बहुसंख्येने उपस्थित राहणारअसा विश्वास स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दीपक पाटील यांनी व्यक्त केला.आहे. यावेळी पाटील म्हणाले, पाटणेफाटा येथील व्ही.के.चव्हाण महाविद्यालय करवे येथे मैदानावर शनिवारी सकाळी ११ वाजता भव्य शेतकरी मेळावा होणार आहे. मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी,राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या तोफा धडाडणार आहेत. या मेळाव्याला चंदगड, आजरा,गडहिंग्लज,बेळगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष जगन्नाथ हुलजी यांनी केले आहे.