Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात दाखल

0

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना संसर्गची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. राज्यपालांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.

तसेच दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटानं बंड केला असून शिंदे आज राज्यपालांना भेटणार आहेत. ते यासाठी मुंबईत येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी राज्यपालांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांचा विचार केला तर संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.