Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथ शिंदेंच्या संरक्षणासाठी गुवाहाटी येथील हॉटेल बाहेर CISF जवान तैनाद

0

 

महाविकास आघाडीमधील मुख्य घटक पक्ष असलेला शिवसेना पक्षात मोठी फूट पडली असून एकनाथ शिंदे हे अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये गेले आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात असल्याचे दिसून येत आहेत. गुवाहाटी येथील ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. त्या हॉटेल बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन येथे महाराष्ट्रातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. दरम्यान शिंदे काल सुरत येथील एका हॉटेलमध्ये राहिले होते. महाराष्ट्र आणि गुजरात लागून राज्ये असल्याने महाराष्ट्रातील काही नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी येत असल्याने त्यांनी गुवाहाटी येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलबाहेर CISF चे जवान तैनात करण्यात आले आहेत. या हॉटेलला चारही बाजूंनी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आणखी पोलीस फौजफाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.

एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्टकरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.