मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चीन शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक सूचक विधान करून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला विषय दिला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांचे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहे आणि ते आजही आहे. आमच्या मनात कधीही कटुता नाही. आमच्या घरात आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही’ असं वक्तव्य माजीमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी यांनी केलं आहे.
एका माध्यमाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली असताना त्यांनी या वितरण सभारंभात विधान केले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या प्रश्नावर भाष्य केलं. ‘देवेंद्र फडणवीस यांचे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहे आणि ते आजही आहे. आमच्या मनात कधीही कटुता नाही. आमच्या घरात आम्ही कुणालाही व्यक्तिगत पातळीवर शत्रू मानत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले अगदी खालच्या थराला जावून आरोप करण्यात आले. कधीही माझ्या तोंडातून याबद्दल कधीही अशी विधानं आली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ‘त्यांच्या मनामध्ये सुरू होतं.
आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे, पण त्यांनी काहीही म्हटलं नाही. जर बंडखोरी केली असती तर चाललं असतं. पण, त्यांनी गद्दारी केली आहे. पाठीवर त्यांनी खंजीर खुपसला आहे. ज्यांनी स्वता: ला विकलं, जे आधीच विकले गेले होते. त्यांनी कसं समजावून सांगणार होतो, असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केली. मी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं. तुम्ही माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, नाहीतर मी तुमच्या ठाण्यातून निवडणूक लढवून दाखवतो, पण ते हिंमत दाखवत नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.