भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सकाळी कोल्हापुरात पोहचताच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एक घोटाळ्याचा आरोप लगावला आहे. हसन मुश्रीफ कुटुबीयांचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता, पण 500 कोटींचे आकडे बाहेर यायला लागले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेला सोडलं नाही, असाही आरोप त्यांनी केला.
किरीट आज सोमय्या आज कोल्हापुरात आहेत. साक्ली ७:०० वाजता ते रेल्वेने कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापुरात पोहोचताच हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेत भेट घेणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येतात, पण मी सांगितलं मीच भेटायला कोल्हापूरला येतो. गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या आपल्या जीवाची पर्वा करणार नाही. न्यायालयात काय होतंय पाहुया…
सोमय्या म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि घोरपडे सहकारी साखर कारखान्यालाही लुटण्यात आलं. आता त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी आज बँकेला भेट देणार आहे. दरम्यान, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर शक्तिप्रदर्शन करत सोमय्यांचं स्वागत केलं.
दरम्यान, सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि घोरपडे कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेवरही छापेमारी केली आहे. तसेच ‘ब्रिक्स’ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.