Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यपालांनी नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही’ – मनसे

0

 

राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्या वादग्रस्त विधानावर सर्वच राजकीय पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आता त्या पाठोपाठ मनसेने सुद्धा या विधानाचा समाचार घेतला आहे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. ज्या गोष्टींचा आपल्याला इतिहास माहित नाही. त्या गोष्टीबद्दल राज्यपालांनी इतर विषयांमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही’ अशा शब्दांत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानावरून राजकीय वातावरण पेटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ‘ही बौद्धिक दिवाळखोरी आहे.

ज्या गोष्टींचा आपल्याला इतिहास माहित नाही. त्या गोष्टीबद्दल राज्यपालांनी इतर विषयांमध्ये नाक खुपसण्याची गरज नये. मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली ती 105 जणांच्या हुतात्मामुळे मिळाली आहे. महाराष्ट्राने प्रगती स्वत:च्या जिवावर केली आहे.

महाराष्ट्राची प्रगती ही मराठी माणसामुळे झाली आहे. मराठी माणसाने प्राणाची आहुती दिली आहे. पहिले जे राजकारणी होते त्यांनी महाराष्ट्रात उद्योग धंदे आणले, त्यामुळे राज्याचा विकास झाला, महाराष्ट्रामुळे ते आहे हे लक्षात घ्यावे, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.