राजाराम साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टॅटीज पती आणि महादेवराव महाडिक पुन्हा एकदा आमने सामानाने येणार असून निवडणुकीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा कोलाहपुरातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने कोल्हापूरात उत्सहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
आज राजारामच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाचे अर्ज शक्तिप्रदर्शनाने भरण्यात येणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांना सकाळी दहा वाजता सासने मैदानावर बोलवले आहे. तसेच स्वतः आमदार पाटील या वेळी उपस्थित रहाणार आहेत. तर सत्ताधारी गटाचे उर्वरीत अर्ज देखील आज भरण्यात येणार आहेत. त्यामुळे राजाराम कोणाकडे जाणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांना पाडण्यासाठी सतेज पाटील यांनी तत्कालीन विरोधी पक्षाचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती तसेच संजय मंडलिक यांना निवडून आणण्यामध्ये सतेज पाटील यांचा सिहाचा वाटा आहे. त्यानंतर पार पडलेल्या गोकुळ निवडणुकीत सुद्धा सतेज पाटलांनी महादेवराव महाडिकांना जोरदार धक्का दिला होता.