मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबद्दल आजतागायत फक्त विरोधी पक्षातील भाजपा नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे यांचे चुकलात भाऊ, माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही” असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत तसेच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडला नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात. मुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे. त्यांना पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाहीय. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात”.