Latest Marathi News

BREAKING NEWS

राहुल गांधी जनमत तयार करणार; अदानी मुद्द्यावर देणार जोर

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टिपणीवरून कोर्टाने थेट राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेनंतर त्यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली तर दुसरीकडे खासदारकी गेल्यानंतर त्यांना सरकारी बंगला खाली करण्यासाठी नोटीस धाडण्यात आली याच सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आंदोलन छेडले होते अशहतच आता पुन्हा एकदा मोदी सरकारला अदानीच्या मुद्द्यवरून घेरण्यासाठी काँग्रेस प्लॅन आखत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात सुरत येथील ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका तयार आहे सुरत येथील सत्र न्यायालयात ती लवकरच दाखल करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार एक-दोन दिवसांत सुरत सत्र न्यायालयात दाखल होणाऱ्या पुनर्विलोकन याचिकेवर काम करत आहेत. ‘चौकीदार चोर है’ या उल्लेखापेक्षा अदानी प्रकरणामुळे जनमत आपल्या बाजूने तयार होऊ शकते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वाटते.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, अदानी प्रकरणाबाबत सातत्याने बोलत राहिल्यास जनतेचा व अन्य विरोधी पक्षांचाही आपल्याला पाठिंबा मिळेल, अशी शक्यता राहुल गांधी यांना वाटते. तृणमूल काँग्रेस, आप, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी अदानीच्या मुद्द्यावर काँग्रेसला पूरक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अदानीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार आहे याला किताब यश येते हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.