Latest Marathi News

BREAKING NEWS

गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवस कॉरंटाईन करा – उपरकर

0

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी– गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणान्या चाकरमान्यांना सात दिवसाच्या होम कॉरंटाईनची परवानगी द्या, अशी मागणी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आयत्या वेळी होणारा त्रास लक्षात घेता, चाकरमान्यांना या ठिकाणी येण्यासाठी आवश्यक असलेले “ई पास”तसेच आवश्यक परवानग्याचे नियोजन आत्ताच करा. जेणेकरून त्यांना सुट्टी घेणे शक्य होईल त्याहीन प्रयत्न करा, असे आवाहन प्रशासनाला उपरकर यांनी केले आहे.

मुंबईतील चाकरमानी हा बहुसंख्यने मंत्रालय विभाग, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध खाजगी कंपनीत नोकरीस आहे. कोरोना साधीच्या रोगामध्ये मुंबईमध्ये त्यांना ३ महिने कॉरंटाईन करून ठेवल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. आता जास्त दिवस रजा घेणेही शक्य होणार नसल्याने त्यांना ७ दिवसाचे होमकॉरंटाईन करून ठेवणे बाबतचे आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी मागणी श्री.उपरकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्गातील कोरोना संसर्गाचे कारण दाखवून चाकरमान्यांना १४ दिवसाचे संस्थात्मक कॉरंटाईन करणे व नंतर १४ दिवसाचे होम कॉरंटाईन संयुक्तिक होणार नाही. तसेच अनेक चाकरमान्यांचा घरगुती गणपती हा दीड दिवसांचा किंवा ५ दिवसांचा असतो. अशावेळी त्यांना केवळ ५ ते ७ दिवसाची रजा काढून गावी यावे लागते. शिवाय २ दिवस अगोदर येऊन आपली घरे साफसफाई करणे व घराची रंगरंगोटी करावी लागते,याचा विचार करुनच पुढील निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यावेत,असे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

चाकरमान्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना ई-पास देऊन नोंदणी करण्यात यावी. व ज्यांची घरी पूर्णतः रिकामी आहेत त्यांना त्यांच्या घरात होम कॉरंटाईन करण्यात यावे. ज्यांना लॉजिंग व इतर ठिकाणी काँरंटाईन होणे शक्य आहे. त्यांना त्याठिकाणी काँरटाईन करण्यात यावे,अशी मागणी उपरकर यांनी केली.

गणेश चतुर्थीनिमित्त गावी येणाऱ्या मुंबईकर-पुणे चाकरमान्यांसाठी आताच कॉरंटाईनचे नियम निश्चित करुन तसे जाहीर करण्यात यावे. म्हणजे गावी येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास काढणे, गाड्यांच बुकिंग करण व आपल्या गरजा मंजूर करून घेणे सुलभ होईल,असे मत परशुराम उपरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रात व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.