Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यातील चांदणी चौकाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण !

0

पुणे । पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी नवे वाहतुक नियम लागू होण्याची शक्यता आहे. आज त्या संदर्भात बैठक पार पडणार आहे. त्यामुळे पुणेकरांसह राज्यातील नागरिकांच्या नजरा पुण्याकडे लागल्या आहेत.

या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच तत्कालीन पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्यामुळे हे दोन्ही नेते कायकाय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अवघ्या 10 महिन्यात या उड्डाणपूलाचं काम पूर्ण झालं. आज या पुलाचं उद्घाटन होत आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

चांदणी चौक परिसरात काल संध्याकाळी डॉग पथक आणि बॉम्बशोध पथक दाखल झालं. त्यांनी परिसराची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची चाचपणी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण पेंडॉलची तपासणी करण्यात आली. पुणे पोलिसांचं एक पथकही काल संध्याकाळी कार्यक्रम स्थळी दाखल झालं आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण करण्यात झाली आहे. सगळीकडे नितीन गडकरींच्या आभाराचे बँनर झळकवण्यात आले आहेत.

नारायण राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? राऊतांनी न्यायालयात नोंदवला जबाब

नरेंद्र मोदी हे देशाला धोकादायक, त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार करावा

Leave A Reply

Your email address will not be published.