Latest Marathi News

BREAKING NEWS

पुणे शहरातील चांदणी चौक परिसरात दारूच्या, बिअरच्या बॉटल लटकावून आंदोलन !

0

पुणे । पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

मात्र या उदघाटनापूर्वीच दुसरीकडे एक अनोखे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्व पुणेकरांचे लक्ष वेधले गेले आहे. दारूच्या, बिअरच्या बॉटल लावून हे आंदोलन केले जात आहे. चेंज इंडिया फाऊंडेशनकडून हे आंदोलन केले जात आहे.

पुण्यातील चांदणी चौक परिसरात दारूच्या, बिअरच्या बॉटल लटकावून आंदोलन सुरु आहे. प्रतिकात्मक सह्यांची मोहिमही घेतली जात आहे. चेंज इंडिया फाऊंडेशनकडून हे आंदोलन केले जात आहे. चांदणी चौकाला एनडीए ब्रिज नाव द्या, अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. बदनाम असणाऱ्या चांदणी ऐवजी एनडीए ब्रिज म्हणा, अशी मागणी केली आहे.

चांदणी चौक यामधील चांदणी हा शब्द बदनाम आहे. त्याला कोणताही इतिहास नाही. प्रेरणा नाही. परंतु पुणे शहरात इतिहास आणि गौरवशाली परंपराला लाभलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीए आहे. देशात दोन ठिकाणी अशी संस्था आहे. त्यात पुणे शहरात एनडीए आहे. या संस्थेला एक मोठी परंपरा आणि गौरवशाली इतिहास आहे. यामुळे या पुलास एनडीए ब्रीज नाव देण्याची मागणी चेंज इंडिया फाऊंडेशनकडून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.