Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यात कसबा – पिंपरी चिंचवडची जबाबदारी ‘या’ पदाधिकाऱ्यांच्या हाती

0

: कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाविकास आघडीसहित इतर अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कसबा पिंपरी निवडणूक बिनविरोध होण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. कसब्यात भाजपचे तब्बल ४० वर्षांचे वर्चस्व कमी करण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे आता भाजपने निवडणुकांची रणनीती आखली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची जबाबदारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख म्हणून म्हणून काम पाहणार आहेत. तर धीरज घाटे यांच्याकडे निवडणूक सहप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक लढवण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील होते. भाजपचे हेमंत रासने आणि अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीकडे विनंती केली होती. परंतु दोन्हीकडे आघाडी ठाम राहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.