राज्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून थेट ४० आमदार बरोबर घेउं भारतीय जनता पक्षासोबत युती करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून आले होते अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपाक केसरकर हे सतत उद्धव ठाकरे गटाच्या सर्व आरोपांना प्रतिउत्तर देताना दिसून आले होते त्यातच आता त्यांनी युद्ध ठाकरे आघाडीतुन बाहेर पडणार असल्याचे सूचक विधान करत राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना विषय दिला आहे.
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. तसेच ते दिल्लीवरून कबूल करून आले होते की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, पण त्यांनी तस केलं नाही”, असा धक्कादायक खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकार यांनी केला आहे. खरी शिवसेना कोणाची या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसे सुरू आहेत. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगात सांगावं. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे, असा आरोपही यावेळी दीपक केसरकर यांनी केला.
मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. काय म्हणाले दीपक केसरकर? शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं यावर सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडावे. मात्र, ते न करता.ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काय वाटत हे महत्त्वाचं नाही. सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नाहीत. सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग उद्धव ठाकरे याचं म्हणणं ऐकेल का?त्यांची सुरू असलेली ही सगळी धडपड व्यर्थ आहे. अस बोलून लोकांची सहानुभुती मिळवणं गैर आहे. लोकांना खर काय ते सांगायला हवं. प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आम्ही लोक आहोत.
तसेच भाजपसोबत बोलणी सुरू होती. असे असतानाही मूळ युती तोडून तुम्ही दुसऱ्यासोबत गेले, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकलं नाही : दीपक केसरकर मी काय कोणी मोठा मनुष्य नाही. पण मी ते घडवून आणलं होतं. पक्षाच हित म्हणून मी ते केलं. पंतप्रधानांशी भेट घडवून आणली. त्यावेळी बोलणी केली आणि ती चूक दुरुस्त करायची संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा खुलासाच दीपक केसरकर यांनी केला.