Latest Marathi News

BREAKING NEWS

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

0

मुंबई : मुंबई विद्यापीठातील विविध अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी  बैठक संपन्न झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली.

या वेळी नामांकित असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांसह गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्या जास्त आहे. परीक्षेचे नियोजन, निकाल वेळेत जाहीर करणे. याबाबत कालबद्ध पद्धतीने  नियोजन करावे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत लागली, तर त्या बाबतही आराखडा तयार करावा आणि वेळेत परीक्षेचे  निकाल जाहीर करावेत. तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देऊन तातडीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी. बैठकीत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी, विद्यार्थी डेटा, डॅशबोर्ड, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू अजय भामरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.