पुणे: संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या 2 लाखांच्यावर पोहचली आहे. मुंबई पाठीपाठ पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड सह संपूर्ण जिल्ह्यात पुणे एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे.
13 जुलै ते 23 जुलै असा 15 दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. लवकरच याबाबतची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल, दवाखाने आणि दूध सुरु राहील. अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.