Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रेयसीसोबत लॉजवर घडलेला धक्कादायक प्रकार आला समोर

0

 

सावनेर या परिसरात रविवारी सायंकाळी एक विचित्र घटना उघडकीस आली. सावनेर बस स्टॉपच्या मागील केशव लॉजमध्ये एक २७ वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीसोबत संभोग करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्ती ही कळमेश्वर ताल्युक्यातील धापेवाडा या गावातील निवासी असून खासगी चार चाकी गाडी चालविण्याचे काम करत होता.

प्राथमिक समोर आलेल्या माहितीनुसार प्रेयसी सोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याच अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉजमध्ये आपल्या प्रेयसी सोबत आला होता.

दोघेही आत गेल्यानंतर थोड्यावेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला. घाबरलेल्या प्रेयसीने त्याच्या मित्रांना बोलावले, त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या मिळाल्या असून त्याच्या अति सेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.