Latest Marathi News

BREAKING NEWS

लोकप्रिय अभिनेत्रीला महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी पुण्यात अटक

0

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात वेब सीरिजमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीने कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चावल्याचा आणि हल्ला केला असल्याचा आरोप आहे.या प्रकरणी तक्रारीवरुन 28 वर्षीय अभिनेत्रीविरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात एफआय़आर दाखल करण्यात आला आहे.

परवीन शेख असं या घटनेत जखमी पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे. आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारची आहे. आरोपी अभिनेत्री ही मुंबईतील अंधेरी परिसरात राहाते.ती मुळची कर्नाटकमधील असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांनी तिच्या नावाचा खुलासा केलेला नाही. महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख या दामिनी स्क्वाडच्या सदस्याही आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये काम केलेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.