Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रजासत्ताक दिनी सीपीआर करणार “थुंकी मुक्त परिसर” करण्याचा संकल्प..

0

सीपीआर हॉस्पिटल हे थोरला दवाखाना म्हणून ओळखले जात असून गरजू तसेच सर्वसामान्यांसाठी आधारवड आहे .येथील वास्तुला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे .असे असताना आज या वास्तूची तसेच परिसराची अवस्था सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने तसेच कचरा टाकल्यामुळे दयनीय होत आहे. या पार्श्वभूमीवर आज थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीच्या शिष्टमंडळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांची भेट घेतली.

उद्याच्या प्रजासत्ताक दिनी तंबाखू सेवन विरोधी शपथ घेण्यात येईल तसेच सीपीआर हॉस्पिटल परिसर, तसेच सर्व वास्तू या थुंकी मुक्त ठेवण्यासाठी प्रबोधन व कठोर कारवाई द्वारे संकल्प केला जाईल. असे आश्वासन डॉक्टर दीक्षित यांनी यावेळी दिले.यापुढे केवळ रुग्णांचे नातेवाईक च नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही जबाबदारीचे महत्त्व पटवून देऊन थुंकल्यास स्वतःच स्वच्छता करावी लागणार आहे.

सीपीआर रुग्णालय हे थुंकीमुक्त व आरोग्यदायी राहण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील .अशी शाश्वती दिली.यावेळेस वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळेही उपस्थित होते. देशात प्रथमच सुरुवात झालेल्या थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीचे त्यांनी कौतुक केले व यापुढे रा. छ. शा. म. वैद्यकीय महाविद्यालयाचाही पुढाकार राहील. असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.