Latest Marathi News

BREAKING NEWS

चिंचवड पोटनिवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

0

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मुद्द्यवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. महाविकास आघाडीकडून दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं, असं मत राष्ट्रवादीच्याखासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. मात्र बिनविरोध निवणुकीवरून मी तर्कवितर्क लावू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यात पुण्यात बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीची बैठक सुरु आहे. त्यातून सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांची उपस्थिती होती. पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक भेटीगाठी सुरु आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पोटनिवडणुकीबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, असंही त्या म्हणाल्या.

महाविकासआघाडी सरकारने मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट केलं होतं, असा दावा फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात करत खळबळ उडवून दिली होती. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “आप से ये उम्मिद न थी”, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर काम करावं.

पुण्यातील किंवा राज्यातील अनेक गुन्ह्यांबाबत चर्चा करायला हवी होती. त्यासोबतच त्यांनी गुन्ह्यांतं प्रमाण कसं कमी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग सक्रिय आहे. त्यांनी त्यावर तोडगा काढायला हवा शिवाय गोळीबाराच्या प्रकरणातदेखील वाढ झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.