Latest Marathi News

BREAKING NEWS

‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांचा शो रद्द केलात तर..,अमेय खोपकरांचा थियेटर मालकांना इशारा

0

‘पठाण’ चित्रपटामुळे जर मराठी चित्रपटाचे शो थिएटर मालक रद्द करत असतील तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. ज्या मराठी चित्रपटांचे शो ‘पठाण’मुळे रद्द करण्यात आले आहेत ते पुन्हा लावले जावेत नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईल आंदोलन केलं जाईल, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. सिनेमागृह-मल्टिप्लेक्सवर हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना नेहमीच दुय्यम स्थान मिळतं.

पुढे बोलताना खोपकर म्हणाले की, आज मराठी चित्रपट बॉलिवूडला चांगली टक्कर देत आहेत. हिंदीच्या तुलनेत मराठी सिनेमांचं निर्मितीमूल्य आणि जाहिरातबाजी कमी असली, तरी गेला महिनाभर मराठी सिनेमे चित्रपटगृहांत चांगली कामगिरी करीत आहेत. ‘वेड’, ‘वाळवी’,’सरला एक कोटी’, ‘व्हिक्टोरिया’ बॉक्स ऑफिसवर सरस ठरले.

दरम्यान आज शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्याचा मराठी चित्रपटांच्या शोवर परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थिएटर मालकांना इशारा दिला आहे. ‘पठाण’ चित्रपटामुळे जर मराठी चित्रपटाचे शो थिएटर मालक रद्द करत असतील तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. ज्या मराठी चित्रपटांचे शो ‘पठाण’मुळे रद्द करण्यात आले आहेत ते पुन्हा लावले जावेत नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.