Latest Marathi News

BREAKING NEWS

“मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता” फडणवीसांच्या या आरोपाबाबत संजय राऊत म्हणतात

0

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता तेव्हाचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना हे टार्गेट दिले होते असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता असा खळबळजनक आरोप उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता.
एका मराठी वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत हा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. या आरोपाला ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले की, “यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे विधान खोटं असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. फडणवीस यांच्यानंतर त्याच वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत राऊत यांनी याबाबत भाष्य केले. “फडणवीस हे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री होते. विरोधकांना तुरुंगात पाठवण्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही,मात्र गेल्या सात वर्षात ही परंपरा सुरु झाली असून आम्ही त्याचे बळी आहोत” असंही राऊत यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासारखा सुसंस्कृत मुख्यमंत्री असताना अशा घटना घडण शक्य नव्हतं. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे हा गुन्हा आहे,त्यासंदर्भात होत असलेली पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होऊ द्यायला हवी होती. परंतु हे प्रकरण आपल्यापर्यंत येईल म्हणून तुम्ही का अस्वस्थ आहेत. तुम्ही अस्वस्थ नसता तर सरकार आल्यावर पोलीस अधिकाऱ्याची चौकशी थांबली नसती” असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.