Latest Marathi News

BREAKING NEWS

‘पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे’

0

 

सातारा | राज्यात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींसंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने भाजप नेत्यांकडून अनेक कमेंट केल्या जात आहेत. अशातच शिंदे यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासंवर मांडला आहे. मात्र दुसरीकडे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे. “रिमझिम पाऊस पडे सारखा मिठीलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे.”असे ट्विट करीत अतुल भातखळकर यांनी सेनेला चिमटा काढलाय. शिवाय सध्याच्या स्थितीवरून भाजपचे नेते शिवसेनेवर टीका करीत आहेत.

तर दुसरीकडे “ ठाकरेंचे दिवस फिरले… ” असे ट्विट भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे तर नारायण राणे यांनी देखील ट्विट केले आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.एक सूचक ट्विट केलं आहे. तेही जास्त चर्चेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.