Latest Marathi News

BREAKING NEWS

पक्षप्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत..’ नाव न घेता पाडळकरांचा उद्धव ठाकरेंसह पवारांना टोला

0

सतत पवार कुटुंबियनवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय वातावरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत काही तासांच सरकार स्थापन केले होते.

या शपथविधीनंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झाले होते, असे विधान त्यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे, म्हणून आपण सरकार तयार करू. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

“उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” असं गोपीचंद पडळकर या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. या पूर्वी सुद्धा पडळकर यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार तसेच रोहित पवारांवर निशाणा साधला आहे या टीकेला राष्ट्र्वादीने सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.