अभिनेत्री कंगना रणौत ट्विटर अकाउंट पुन्हा कार्यरत झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. कंगनाचे बेधडक विधान नेहमीच चर्चेत असतात. काल रात्रीच कंगनाने चित्रपटाच्या रिलीज डेटवरुन बॉलिवूडच्या ‘माफिया’वर निशाणा साधला आहे. माझा सिनेमा येणार हे कळताच बॉलिवूड माफियांमध्ये सिक्रेच मीटिंग्स सुरु आहेत असं तिने ट्वीटमध्ये म्हणले आहे. याद्वारे तिने थेट बिग बी यांचेही नाव घेतले आहे.
कंगनाचा आगामी ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.यासाठी ती खूप उत्सुक आहे. मात्र चित्रपटाची रिलीज डेट अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ यांच्या ‘गणपत’ या सिनेमासोबत क्लॅश होत आहे. त्यामुळे आता कंगनाने तिच्या सिनेमाची रिलीज डेट ट्रेलर सहित केवळ एक महिना आधी जाहीर करेल असे सांगितले आहे.
कंगनाने ट्विटमध्ये लिहिले, ‘इमर्जन्सी सिनेमासाठी मी रिलीज डेटचा विचार करत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की यावर्षी अनेक तारखा रिकाम्या आहेत. कोणताच सिनेमा रिलीज होणार नाहीए. हिंदी फिल्म इंडस्ट्री सध्या वाईट काळातून जात असल्याने हे चित्र असू शकते. माझ्या प्रोडक्शन टाईमलाईननुसार मी इमर्जन्सी साठी २० ऑक्टोबर ही तारीख निवडली. यानंतर एकाच आठवड्यात टी सिरीजचे भूषण कुमार यांनी २० ऑक्टोबरलाच त्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट ठेवली.
संपूर्ण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अगदी सप्टेंबर महिना रिकामा असतानाही आज मिस्टर अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांनी २० ऑक्टोबरलाच त्यांच्या बिग बजेट प्रोजेक्टची घोषणा केली. हाहा..बॉलिवूड माफिया गॅंग्समध्ये बहुतेक सिक्रेट मीटिंग सुरु आहेत. ‘आता इमर्जन्सी ची रिलीज डेट मी ट्रेलरसहित एक महिना आधी जाहीर करेल. जेव्हा अख्खं वर्ष मोकळं आहे तर क्लॅश होण्याची गरजच काय आहे भाई? इंडस्ट्रीचा वाईट काळ आहे तरी इतकी दुर्बुद्धी. काय खाता यार तुम्ही, इतकी विध्वंसक वृत्ती कशी असू शकते?