Latest Marathi News

BREAKING NEWS

जर तिला एक हजार पुरुषांसोबत…… अयोध्यातील महंतांचे स्वाराबद्दल वादग्रस्त विधान

0

विधस्त विधाने करणारे अभिनेत्री स्वरा भास्करनं समाजवादी पक्षातील युवा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यामुळे ती अनेक हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आली आहे. अनेक हिंदू धार्मिक नेत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी स्वरावर जोरदार टीका करत तिची तुलना श्रद्धा वालकर या खून झालेल्या हिंदू तरुणीशी केली होती.

आता, आयोध्येतील महंत राजू दास यांचाही टीकाकारांमध्ये समावेश झाला आहे. मुस्लिम मुलाशी लग्न केल्याप्रकरणी त्यांनी स्वराला अल्टिमेटम दिला आहे. राजू दास असंही म्हणाले की, स्वरा भास्कर जर एक सशक्त महिला असती तर तिनं हे लग्न केलंच नसतं. शिवाय त्यांनी तिच्याबद्दल इतर काही आक्षेपार्ह वक्तव्यंही केली आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. राजू दास म्हणाले, “जर तिला एक हजार पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल तर त्यासाठी तिचं अभिनंदन. कारण तिनं अशा समाजातील मुलाशी लग्न केलं आहे जिथे भाऊ-बहिणी एकमेकांशी लग्न करतात आणि नंतर तलाक, तलाक, तलाक म्हणत सहज वेगळे होतात”.

“स्वरा भास्करनं उघडपणे इन्शा अल्लाह आणि भारत तेरे टुकडे होंगे, असं म्हटलेलं आहे. १० दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीला ती ‘भाई’ म्हणाली होती आणि त्याला लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला होता, त्याच व्यक्तीशी तिनं आता लग्न केलं आहे,” असंही महंत दास म्हणाले. या पूर्वी, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी स्वराबद्दल म्हटलं होतं, “स्वरा भास्कर नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचं दिसलं आहे. मला खात्री होती की, ती नक्कीच आंतरधर्मीय लग्न करेल आणि तिने तेच केलं आहे. तिनं एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.