Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांचा हा दावा

0

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मंगळवारी मुंबईत होता. त्या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अशात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक वेगळाच आरोप शरद पवारांवर केला आहे. शरद पवारांनी राजीनामा देणे मला अपेक्षितच होते. असे दमानिया म्हणाल्या.

शरद पवार यांनी एवढ्यात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणे हे मला अपेक्षित होते. १९ एप्रिलला मी माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना सांगितले होते की आत्ता जे सगळं सुरू आहे ते माझ्या राजकीय विश्लेषणाप्रमाणेच आहे. ते हेच आहे की भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती करायची आहे. पण त्या युतीत भाजपला शरद पवार नकोत. त्यांना फक्त अजित पवारच हवे आहेत. अजित पवार जर पक्ष फोडून गेले असते तर ते शरद पवारांना मान्य झाले नसते. पक्ष फुटत असल्याचे त्यांना सहन झाले नसते, असे दमानिया म्हणाल्या.

पक्ष फुटताना बघणे किंवा राजीनामा देणे आणि अजित पवारांना अध्यक्ष करणे असे तीनच पर्याय शरद पवारांपुढे उरले होते. आत्ताच्या घडीला जे काही दबावतंत्र चालले आहे ते भाजपकडून सुरू आहे. भाजपला महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवायचे आहे. त्यासाठी ते वाट्टेल ते करण्यास तयार आहेत. आज जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आपण अजित पवार यांची बॉडी लँग्वेज बघितली तर ते सारखे कार्यकर्त्यांवर चिडताना दिसत होते. त्यावरूनच सगळे लक्षात आले, असेही दमानिया म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.