Latest Marathi News

BREAKING NEWS

कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही, शिंदे गटाचा टोला

0

मागच्या काही दिसवांपासून राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर फडकावले जात असून राष्ट्रवादीच मुख्यमंत्री होणार असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या बॅनरबाजीवर शिंदे गटाच्या नेत्याने प्रतिउत्तर दिले आहे. -राज्यातील शिंदे व भाजप युतीचे सरकार पाच वर्ष निश्‍चित पूर्ण करणार आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. केवळ बॅनरबाजी करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. या माध्यमातून विरोधक राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.

ते पुढे म्हणाले, राज्यात शिंदे सरकारचे 16 आमदार अपात्र होणार अशी चर्चा असून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा वावड्या उठवल्या जात आहेत. या संदर्भातील प्रश्‍नावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, असे काही नाही कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे, हे पाच वर्षे सरकार पूर्ण करणार आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतरही शिंदे व भाजप युतीचेच सरकार येणार आहे. विरोधकांनी कितीही संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला तरी त्याने काही फरक पडत नाहीत.

आमची विकास कामेच आमचे नैतिक बळ असून ती कामेच बोलत असतात. राज्य शासनाचे 16 आमदार अथवा त्या संदर्भातील निकालाच्या संदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले, हा सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारितील विषय आहे त्यावर मी बोलू शकत नाही. पण निकाल आमच्याच बाजूने लागणार असा आमचा ठाम विश्‍वास आहे आमच्या मांडणीमध्ये खरेपणा आहे. त्यामुळे खरेपणाला न्याय मिळणार हे निश्‍चित असे ते म्हणाले. अजित दादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चे संदर्भात त्यांना छेडले असता ते म्हणाले, कालच महा विकास आघाडीची मुंबईत वज्रमुठ सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा अजित पवार उपस्थित होते व तिकडेही त्यांची उपस्थिती इकडे भाजप प्रवेश असे होऊ शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.