मुंबई | अजित पवारांनी बंडखोरी करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच त्यांच्यासोबत ९ नेत्यांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ गेहतली या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली होती. त्यातच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केलेले प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडल्याचं मानलं जात आहे.
अशातच प्रफुल्ल पटेल यांनी आज यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आता मागे वळून पाहणार नाही, येत्या १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी शरद पवार यांना फोन करणार आहेत. येत्या १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. आता आम्ही मागे वळून पाहणार नाही अशी सुकंकः प्रतिक्रया पटेल यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे सगळं आमचंच आहे, ते आमच्याकडेच राहणार आहे असा दावा देखील प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. गुरुपौर्णिमेला मी स्वतः शरद पवार यांना फोन करणार असून त्यांचे आशीर्वाद मागणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावर आता पवारांसोबत असलेले नेते काय प्रतिक्रया देतायत हे पाहावे लागणार आहे.