राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए महाराष्ट्रात छापेमारी सुरु केली आहे. दहशतवादी कारवाया केल्याच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एनआयएने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर एनआयएला संशय आला की, आणखी काही जण ISIS च्या संपर्कात आहेत आणि त्यानुसार एनआयएकडून छापे टाकले जात आहेत. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.
मुंबईसह पुण्यात एनआयए कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे. पुण्यात एनआयएने छापेमारी सुरु आहे. एनआयएच्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.