मुंबई |
महाराष्ट्राच्या राजकारणात रविवार मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे. अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाला आहेत. रविवारी सकाळी इतक्या वेगाने घटना घडल्या की कोणाला काही कळायच्या आधीच अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले होते. विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात अनेकांना याची कल्पनाच नव्हती. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर आज ३ जुलै रोजी अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना भेटण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आज पहाटेपासून त्यांच्या देवगिरी बंगल्यावर चाहते, हितचिंतक, नागरिकांची रीघ लागली असून अजित पवारही नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत. जिथे दादा तिथे गर्दी याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा येत आहे…