Latest Marathi News

BREAKING NEWS

युद्धाला पाक लष्करप्रमुख मुनीर जबाबदार!

0


मुनीरला अटक, देशद्रोहाचा खटला चालणार, पाकची आंतरबाह्य कोंडी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आणि या तणावाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. त्यामुळे जोरदार हल्ले-प्रतिहल्ले सुरू झालेले असताना पाकिस्तान आतून पोखरला जात आहे. अंतर्गत बंडाळी वाढली आहे. भारताने जोरदार हल्लाबोल करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. त्यातच आता परिस्थितीला लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबदार असल्याचा ठपका ठेवत थेट लष्करप्रमुखालाच ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचे मत तेथील नागरिक आणि सत्ताधाºयांचे झाल्याची माहिती आहे. त्यामुळे असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे.


दरम्यान, असीम मुनीरला तुर्कस्थानला घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. असिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न केला जात आहे. असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथावायचे आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा, असा असीम मुनीर याचा डाव होता, असे बोलले जात आहे.


पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसताना असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचा पाक नागरिकांत समज आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे. सध्या पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही. अशाही स्थितीत असीम मुनीरने पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटले. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार असून, यातून पाकला सावरणे कठीण होणार आहे.


जानेवारी २०२३ मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, एप्रिल २०२३ मध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, जून २०२४ मध्ये वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाºया बसवर हल्ला, आॅक्टोबर २०२४ मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाºया मजुरांवर हल्ला, या सगळ््या दहशतवादी कारवायांमागे मुनीरचे डोके होते. दहशतवाद पसरवण्यासाठी त्याने पंजाब प्रांतातल्या गँगस्टर्सचीही मदत घेतली होती. असीम मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही तर एक कॉर्पोरेट नेताही आहे. ज्याने शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आपल्या हातातले खेळणे बनवून ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.